28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home परभणी परभणीला पहिल्या टप्प्यात साडेनऊ हजार कोविड लसींचे डोस मिळणार

परभणीला पहिल्या टप्प्यात साडेनऊ हजार कोविड लसींचे डोस मिळणार

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोनावरील लसींचा ड्राय रन यशस्वी झाल्याने देशभरातील नागरिकांना आता या लसींची प्रतिक्षा लागली आहे. पहिल्या टप्यात परभणी जिल्ह्यासाठी दिली जाणारी लस अवघ्या काही तासात उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी ९ हजार 500 इतके डोस जिल्ह्यात मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.

परभणी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून कोव्हिड लसीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परभणी जिल्ह्यासाठी कोव्हिड लसचे ९ हजार 500 डोस उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार औरंगाबादहून ही लस घेऊन परभणीकडे वाहन निघाले आहे. हे वाहन काही तासात परभणीत दाखल होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. त्यानंतर लसीकरणास सुरूवात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांना लस देण्यात येणार असल्याचे समजते.

जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध
जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात ९ हजार ५०० कोविड लसींचे डोस उपलब्ध होणार आहेत. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सर्व प्रथम आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांना कोविड लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेला शनिवारीपासून तीन ठिकाणी सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे व ड़ॉ. किशोर सुरवसे यांनी दिली.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात परभणी जिल्हा रुग्णालय, सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच परभणी शहरातील जायकवाडीतील महानगर पालिकेचे रूग्णालय असे तीन ठिकाणी शनिवारीपासून (दि.16) लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी – कर्मचा-यांना कोविडची लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी ९ हजार 500 कोविड लसीचे डोस बुधवारी (दि.13) सायंकाळी ७ वाजेपर्यंत परभणीत दाखल होणार होते.

दरम्यान, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी वैद्यकीय अधिकारी – कर्मचा-यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच कोरोना योध्यांचा देखील पहिल्यात टप्यात समावेश करण्यात आला असल्याची माहितीही डॉ. नागरगोजे, डॉ. सुरवसे यांनी दिली.लसीकरणापुर्वी ड्राय रन यशस्विरित्या पार पडला आहे. त्यामुळे देशभरातील नागरिकांना लसीकरणाची उत्सुकता लागली होती. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला शनिवारपासून सुरूवात होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

विशेष विवाह कायदा: ३० दिवसांच्या पूर्व नोटीशीची बाधा संपुष्टात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या