32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeपरभणीपरभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळणार

परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळणार

एकमत ऑनलाईन

परभणी : मिळणार.. मिळणार…अशा बहुप्रतिक्षेत असलेल्या परभणीला अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळणार असून राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरीव निधीची तरतुद केल्यानंतर परभणीकरांनी मोठा जल्लोष केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जे निकष पूर्ण करावे लागतात ते सर्व निकष पूर्ण करूनही परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होत नव्हते.

परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, म्हणून परभणीचे खा. संजय जाधव, परभणीकर संघर्ष समितीचे माजी आ. अ‍ॅड. विजय गव्हाणे, खा. फौजिया खान व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उपोषण, निदर्शने, घेराव, मोर्चा आदी मागार्ने लढा उभारला होता. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी राज्य व केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. राज्यात उस्मानाबाद, रत्नागिरी आदी ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची सरकारने घोषणा केली. मात्र सर्व निकष पूर्ण करूनही आणि मोठा लढा उभारून वरिष्ठ पातळीवर सतत पाठपुरावा करूनही परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घोषित होत नव्हते. त्यामुळे परभणीकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

मात्र आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरू करण्यासाठी भरीव निधीची तरतुद केल्याने परभणीकरांची मागणी पूर्ण झाली आहे. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सभागृहात निधीची तरतुद केल्याचे जाहीर होताच परभणी शहर व जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

परभणीकर संघर्ष समितीने वैद्यकीय महाविद्यालयासाठी उभारलेल्या लढ्याला आज निधी तरतुदीमुळे यश आले आहे. वैद्यकीय महाविद्यालय स्थापणेसाठी परभणीकर संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले. राज्यमंत्री मंडळातील विविध विभागात भेटी देवून परवानग्या मिळविल्या. युती शासनाच्या काळातच यास चालना मिळाली होती ती आता पुर्णत्वास जात असल्याबद्दल आनंद वाटतो.
– माजी आ. विजय गव्हाणे

परभणीकरांचा वैद्यकीय महाविद्यालयाचा लढा सर्वाथार्ने यशस्वी झाला असे सांगत अर्थसंकल्पात जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात कोविड सेंटरचे नूतनीकरण करून त्यात मानसोपचार कक्ष उभारणीसाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा लढा यशस्वी करण्यासाठी संघर्ष करणा-या सर्व पक्ष, संघटना आणि परभणीकर जनतेचे मी अभिनंदन करतो.
– आ. डॉ. राहुल पाटील

राज्यमंत्री असतांना पासून आपण वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा करत आलो आहोत. जमिन अधिग्रहन तसेच इतर सर्व मंजु-यांसाठी संबंधीत सर्व मंत्र्याची भेट घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपली बाजु उचलुन धरल्याने वैद्यकीय महाविद्यालयाला निधी मंजुर झाला आहे. आता केंद्रातही पवार व गडकरी यांच्या माध्यमातून लवकरच मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
खा. फौजिया खान

अखेर परभणीकरांना न्याय मिळाला आहे. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्याने मलाही खूप आनंद झाला. आरोग्याच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारने गोरगरिबांची सोय केली आहे. तसेच परभणीकरांची अत्यंत जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांपासूनची मोठी मागणी सरकारने पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.
– खा. संजय जाधव

सर्व गुणवत्तेत बसत असून देखील परभणी जिल्ह्याला शासकीय महाविद्यालयात डावलण्यात येत असल्याचे आपण विधान परिषदेसमोर मांडून सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. आज उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी अर्थसंकल्पात तरतुद करतांना परभणीतही मेडिकल कॉलेज उभारणार अशी ग्वाही दिली. त्यामुळे सर्वांच्या मागणीला व आंदोलनाला यश आले असुन आपण सरकारचे आभार मानतो.
– आ. बाबाजानी दुर्राणी

१२ धरणांच्या बळकटीकरणासाठी ६२४ कोटी देणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या