परभणी : औरंगाबाद येथे झालेल्या तृतीय खुल्या मॅराथान स्केटींग स्पर्धेत परभणी जिल्हा रोलर स्केटींगच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत सहा सुवर्ण पदके पटकावली आहेत.
औरंगाबाद जिल्हा मराठवाडा रोल स्केटींग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या खुल्या मॅराथान तृतीय राज्यस्तरीय स्केटींग मराठवाडा स्पर्धेचे दि. ३ जुलै रोजी समृध्दी महामार्ग या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील १८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़ हाफ मॅराथान व प्रत्येक गटातल्या मुलाप्रमाणे या स्पर्धा घेण्यात आल्या.
या कॉड स्केटींगमध्ये सहा सुवर्ण पदके मिळाली़ यात साई साठे, सादिया सुलताना, हाजरा फातेमा, श्रावणी मुजमुळे, प्रतिक पांचाळ व अक्षरा मुलमुळे यांना सुवर्ण पदक, ऋतुजा नारायणकर, सारा सुलताना व सोहम थडवे यांना कास्य पदक तर तन्मय मुजमुळे व पृथ्वीराज बल्लाळ यांना रजक पदक मिळाले. या खेळाडूंना रोलर स्केटींग मराठवाडा संघटनेचे अध्यक्ष भिकन अम्बे व तरनुम सुलताना व सुमया खानम, संघटनेचे उपाध्यक्ष दिपक जाधव यांच्याहस्ते पदक देण्यात आले़ यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉग़णेश देशमुख, उपाध्यक्ष रमाकांत जोशी, मुख्य प्रशिक्षक सुर्यकांत डहाळै यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.