30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीभारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत परभणीचा सन्मती कुरकुटे देशात दुसरा

भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत परभणीचा सन्मती कुरकुटे देशात दुसरा

एकमत ऑनलाईन

परभणी : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भारतीय अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत सन्मती कुरकुटे जैन यांनी भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात सन्मती कुरकुटे जैन यांनी दुसरा क्रमांक पटकावला.

सन्मती हे मूळचे परभणीचे रहिवाशी असलेले शरद कुरकुटे यांचे चिरंजीव आहेत. सन्मती हे अभियांत्रिकीमध्ये एम.टेक (मेक.) पदवीधर आहेत. भारतीय लष्करी सेवेत दाखल होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या यशाचे मित्रपरिवाराने कौतुक केले असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

नांदेड जिल्हादंडाधिकारी यांच्या लॉकडाऊन संदर्भात मार्गदर्शक सुचना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या