22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeपरभणीपरभणीचा ऑक्सीजन प्रकल्प दोन दिवसांत कार्यान्वित होणार

परभणीचा ऑक्सीजन प्रकल्प दोन दिवसांत कार्यान्वित होणार

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना आवश्यक असणा-या ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. या अनुषंगाने आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परभणी येथे ऑक्सीजन प्रकल्प उभारण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांनी परळी थर्मल येथील ऑक्सीजन प्रकल्प परभणी येथे स्थलांतरित करण्याचे आदेश मुख्य सचिवांमार्फत विभागीय आयुक्तांना दिले होते. त्यानुसार परळी थर्मल येथील ऑक्सीजन प्रकल्प परभणी येथील जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीत येत्या दोन दिवसात कार्यान्वित होणार असल्याची माहिती आ.डॉ.पाटील यांनी दिली आहे. तसेच ऑक्सीजन प्रकल्पाची मागणी त्वरीत मंजूर केल्याबद्दल आ.डॉ.पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. सद्यस्थितीत परभणी येथील एमआयडीसी परिसरात खाजगी तत्त्वावर उभारण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प अस्तित्वात असून त्याद्वारे जिल्ह्यातील शासकीय व खाजगी कोवीड सेंटर्सना ऑक्सीजन सिलेंडर पुरवण्यात येत आहेत. जिल्ह्याला दररोज 25 के एल क्षमतेच्या ऑक्सिजनची गरज भासत आहे. नव्याने कार्यान्वित होणा-या ऑक्सिजन प्रकल्पातून 80 हजार लिटर प्रतितास एवढ्या क्षमतेची ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.

परळी थर्मल येथून सदर ऑक्सिजन प्रकल्प परभणी येथे स्थलांतरित होत असून परभणी येथील स्टेशन रस्त्यावरील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत परिसरात हा प्रकल्प येत्या दोन दिवसात कार्यान्वित होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी त्वरित मंजूर केल्याबद्दल आ.डॉ.पाटील यांनी जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान हा ऑक्सीजन प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ऑक्सीजनची सध्या भासणारी कमतरता कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. या प्रकल्पातबद्दल नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे.

वयोमर्यादा बाद झालेल्यांना परीक्षेची पुन्हा संधी; एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या