16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeपरभणीपरळी वैजनाथच्या घोड्याला रेवाल चाल स्पर्धेत प्रथम पारितोषिक

परळी वैजनाथच्या घोड्याला रेवाल चाल स्पर्धेत प्रथम पारितोषिक

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील पाथरी रोडवरील लक्ष्मी नगरी येथील मैदानात रेवाल चाल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या रेवाल चाल घोड्याच्या स्पर्धेत गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणाहून घोडे मालकांनी आपल्या घोड्यांना स्पर्धेत उतरविले होते.

या स्पर्धेत जवळपास ५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफि व चांदीचे मेडल पारितोषिक होते. या स्पर्धेतील अंतिम फेरीत पहिला क्रमांक परळी वैजनाथ येथील गणेश देशमुख यांच्या घोड्यास मिळाला. ५१ हजार रोख रक्कम ट्रॉफी, चांदीचे ५०० ग्राम वजनाचे पदक शेख अबूबकार भाईजान यांच्या हस्ते देण्यात आले.

या स्पर्धेतील दुसरे पारितोषिक गुजरातच्या सतीश पटेल यांच्या घोडयाने पटकाविले. त्यांना ३१ हजार रोख रक्कम व ३०० ग्राम चांदीचे पदक सय्यद खादर यांच्या हस्ते देण्यात आले.

तृतीय पारितोषिक लातूर येथील अली स्टड फार्म यांना २१ हजार रोख रक्कम व २०० ग्राम चांदीचे पदक सय्यद इक्बाल यांच्या हस्ते देण्यात आले. रेवाल चाल घोड्यांच्या स्पर्धा यशस्वीतेसाठी अब्दुल रज्जाक, सय्यद अब्दुल हाश्मी, हाजी शोएब, अब्दुल रौफ, सय्यद इक्बाल, उबेद चाऊस आदींनी परिश्रम घेतले. या वेळी परभणी विधानसभेचे आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. टाकळकर, शेख अबूबकार, प्रेमचंद सोनी, तहेसीन अहेमद खान, अ‍ॅड.अशोक सोनी, सय्यद अब्दुल खादर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आज झालेल्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या