18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeपरभणीशेतक-यांच्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा : आमदार डॉ. राहुल पाटील

शेतक-यांच्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा : आमदार डॉ. राहुल पाटील

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावाÞ शेतक-यांना पीक विम्याचे पैसे त्वरित देण्यात यावेतÞ शेतक-यांना २४ तास वीज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बेधडक मोर्चा काढण्यात येणार आहेÞ हा मोर्चा शनिवार बाजार येथून मंगळवार, दिÞ१५ नोव्हेंबर रोजी निघणार आहेÞ या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे.

खासदार संजय जाधव यांनी शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर आयोजित केलेल्या मोर्चा संदर्भात माहिती देण्यासाठी आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये परभणी विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिका-यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार डॉ.पाटील बोलत होते. बैठकीला सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, संजय गाडगे, अंबिका डहाळे, तालुका प्रमुख नंदकुमार अवचार, कृउबा उपसभापती दिलीप आवचार, भगवान धस, संदीप झाडे, सुभाष जोंधळे, सोपानराव अवचार, अरंिवद देशमुख, रवींद्र पतंगे, प्रशास ठाकूर, अनिल डहाळे, सुशील कांबळे, ज्ञानेश्वर पवार, माजी जिल्हाप्रमुख राजू कापसे, संदीप भंडारी, रावसाहेब रेंगे, नवनीत पाचपोर, बाळराजे तळेकर, रामजी तळेकर ज्ञानेश्वर गिरी, बबलू घागरमाळे, मारुती तिथे, संभानाथ काळे, राहुल खंिटग, ऋषी सावंत, शुभम हाके, वंदना कदम, बाळासाहेब गोडबोले, नंदिनी पानपट्टे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ. डॉ. Þपाटील म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी तसेच पावसाच्या खंडामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहेÞ या शेतक-यांसाठी जायकवाडी, येलदरी, दूधना धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात यावेÞ कृषी पंपाचे वीज बिल माफ करावेÞ शेतमजूर, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासह विविध मागण्यांसाठी शहरातील शनिवार बाजार मैदाना पासून मंगळवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा निघणार असल्याची माहिती आÞडॉÞपाटील यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणा-या मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र वायकर, महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख ज्योतीताई ठाकरे, खासदार संजय जाधव हे करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या मोर्चाचे सभेत रूपांतर होणार आहे. या मोर्चात शेतक-यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिका-यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या