29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeपरभणीपरभणीत ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू; शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघडकीस

परभणीत ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू; शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा उघडकीस

एकमत ऑनलाईन

परभणी: परभणी शहरातील शासकीय रुग्णालयामध्ये एका ६५ वर्षीय व्यक्तीचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. मृत रुग्णाला सारी आजाराचे निदान झाले होते. त्यानंतर त्याला परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा ऑक्सिजन न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालायला सुरुवात केली होती. मात्र वेळीच पोलिस आल्याने मोठा अनर्थ टळला.

मृताच्या कुटुंबीयांकडून केलेले सर्व आरोप निराधार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मात्र तसे कॅमे-यासमोर सांगण्यास ते नकार देत असल्याने प्रकरणातील संशय वाढला आहे. परिणामी रुग्णालयाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मृत व्यक्तीचे नाव दासराव आंबटपुरे असे असून ते परभणी शहरातील रहिवासी आहेत.याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

ऑक्सिजनची विचारणा केल्यावर पलायन
आंबटपुरे यांना ३० मार्च रोजी श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यानंतर त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. सारी वॉर्डमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने नातेवाईकांनी शासकीय रुग्णालय प्रशासनातील कर्मचा-यांना ऑक्सिजनची विचारणा केली. मात्र त्यांनी पळ काढला, असा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

नांदेड जिल्ह्यात मृत्यूचे तांडव सुरुच; २६ जणांचा मृत्यू; १२०७ व्यक्ती कोरोना बाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या