22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeपरभणीएसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराने विद्यार्थीनींची पायपीट

एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराने विद्यार्थीनींची पायपीट

एकमत ऑनलाईन

ताडकळस : शासनाने महिलांचे सक्षमीकरण व्हावे या अनुषंगाने ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शिक्षणासाठी शाळेत जाण्यासाठी मानव विकास बस सुरू केल्या आहेत. परंतू परभणी एस.टी.महामंडळ आगारातील अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे चुकीच्या वेळी बस सोडण्यात येत असल्याने विद्यार्थीनींना दररोज ३ ते ४ किलोमीटर पायपीट करण्याची वेळ आली आहे. महामंडळाच्या वरीष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष देवून विद्यार्थीनींची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.

ताडकळस येथे नृसिंह विद्यालय, कै.कमलाबाई वडकुते विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय आहेत. या शाळेत ग्रामीण भागातून येणा-या विद्यार्थीनींची संख्या मोठी आहे. शाळेची वेळ सकाळी १० ची असताना परभणी आगारातून येणारी बस शाळेच्या वेळेपेक्षा दोन तास आधी येत असल्याने विद्यार्थीनींना सकाळी ७.३० वाजता बससाठी हजेरी लावावी लागते. शाळा सुटल्यानंतरही विद्यार्थीनींना दोन तास बसची वाट पहावी लागते.

त्यामुळे विद्यार्थीनी ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करीत शाळा गाठतात. याशिवाय यात्रा, लग्न समारंभ असल्यास पुर्व सुचना न देता बस रद्द करण्यात येते. तसेच माखणी, खडाळा, फुलकळस व मजलापुरसह आदी गावांसाठी एकच बस सोडण्यात येते. सोडलेली बसही अनेक वेळा नादुरुस्त होत असते. या सर्वाचा विद्यार्थीनींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकडे परभणी बस आगारातील वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देवून विद्यार्थीनींची गैरसोय दूर करावी अशी मागणी विद्यार्थीनींसह पालकांमधून होत आहे.

लग्नाची मोठी तारीख असल्यामुळे आज ब-या गाड्या ब्रेक डाउन आहेत. त्यामुळे बसची कमतरता आहे. मानव विकासाच्या बस प्रवासी वाहतुकीस सोडल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाल्या असल्याची माहिती मानव विकास बसचे अनिल राठोड यांनी दिली.

काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा टर्कीचा इरादा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या