26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीस्त्री रुग्णालय बांधकामासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करा

स्त्री रुग्णालय बांधकामासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करा

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी येथील १०० खाटांच्या स्त्री रूग्णालयासाठी केंद्र सरकारकडून अतिरीक्त ०८Þ२० कोटीचा निधी मिळाला नसल्याने इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही का? असा तारांकीत आÞबाबाजानी दुर्राणी यांनी विचारला होताÞ या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अद्याप निधीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली नसून आरोग्य सेवा कार्यालयाकडून स्थानिक स्तरावर जिल्हा नियोजन मंडळ किंवा अन्य स्त्रोतामधून निधी उपब्ध करून घेण्याबाबत कळवण्यात आले असल्याची माहिती दिली. स्त्री रूग्णालयाच्या निधीसाठी स्थानिक पातळीवर नियोजन करावयाचे असल्याने इमारत बांधकाम रखडण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.

आ. दुर्राणी यांनी तारांकित प्रश्नाद्वारे आरोग्यमंत्री सावंत यांना परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर झालेल्या १०० खाटांच्या स्त्री रूग्णालय इमारत बांधकामासाठी रुपये ८ कोटींचा निधी मिळाला नसल्याने इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नाही हे खरे आहे काय असा प्रश्न विचारलाÞ तसेच जिल्हा आरोग्य सोसायटीने सदरील बांधकाम पूर्ण करण्यासाठी वाढीव ८.२० कोटी निधीची मागणी केली आहे काय तसेच या प्रकरणी शासनाने चौकशी करून स्त्री रूग्णालय इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली असे विचारले. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, परभणी जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय बांधकामास अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी राज्य शासनाकडून दि. १ जुलै २०२१ रोजी केंद्र शासनाला ८.२० कोटी निधीचा प्रस्ताव पाठविला होता.

तसेच या संदर्भात दि. ८ मार्च २०२२ रोजी केंद्र शासनास आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांनी पत्राद्वारे पाठपुरावा केला. परंतू अद्यापपर्यंत या प्रस्तावास मान्यता मिळालेली नाही. या निधीबाबत आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या कार्यालयाकडून दि. १७ फेब्रुवारी २०२२ रोजी स्थानिक स्तरावर जिल्हा नियोजन मंडळ किंवा इतर स्रोतामधून निधी उपलब्ध करुन घेण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, परभणी यांना कळविण्यात आले आहे. तसेच या संदर्भात दि. २९ जून २०२२ रोजी जिल्हा शल्य चिकित्सक परभणी यांचेमार्फत जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या