22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeपरभणीपरभणीत दुकाने सुरू ठेवल्यास होणार पोलिस कारवाई

परभणीत दुकाने सुरू ठेवल्यास होणार पोलिस कारवाई

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. तरी देखील काही व्यापारी- विक्रेत्यांनी लपून-छपून दुकाने उघडून खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरु ठेवल्याने महसूल प्रशासनाने तीव्र खंत व्यक्त केली आहे. व्यापा-यांनी दुकाने उघडू नयेत अन्यथा दंडात्मक कारवाई पाठोपाठ पोलिसी कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी दिला आहे.

संचारबंदी असतांना सुध्दा नानलपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री शिवाजी चौकातील इंप्रेशन कापड दुकानदाराने शटर बंद ठेवून आतमध्ये ग्राहक गोळा करीत व्यवसाय सुुरु ठेवला होता. महापालिका व पोलिसांच्या पथकाने या दुकानावर अचानक छापा टाकला तेंव्हा मोठ्या प्रमाणावर ग्राहक दुकानात आढळून आले. या पथकाने दुकानचालकास १० हजारांचा दंड ठोठावला.

या संयुक्त कारवाई पाठोपाठ बुधवारी सकाळी उपविभागीय अधिकारी डॉ.कुंडेटकर यांनी वसमत रस्त्यावरील रंगवर्षा या दुकानचालकाविरुध्द कारवाई करीत १० हजारांचा दंड ठोठावला तर शगून साडीडेपो या दुकानदाराविरुध्द गुन्हा दाखल करावा, असा आदेश डॉ. कुंडेटकर यांनी दिला. इंप्रेशन, रंगवर्षा व शगून या तीन दुकानदारांविरुध्द कारवाई केल्यानंतर व्यापारपेठेत मोठी खळबळ उडाली. या कारवाईनंतर देखील दुपारी काही व्यापा-यांनी शटर बंद करुन ग्राहकांना आतून खरेदी – विक्रीची संधी उपलब्ध करुन देण्याचे प्रकार सुरु ठेवले होते. त्यामुळे महसूल प्रशासनाने मनपा व पोलिस यंत्रणेस दुकाने उघडी ठेवणा-या व्यापा-यांविरूध्द पोलिसी कारवाईचे निर्देश दिले.

ममता बॅनर्जींनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या