32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeपरभणीरेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

एकमत ऑनलाईन

परभणी: कोरोनाच्या संसर्ग काळात रेमडेसिव्हीर या इंजेक्शन चढ्या दराने विक्री करणार्‍या दोघांना न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शहरातील बस स्थानकाजवळील मेडिकल लाईनमध्ये असलेल्या काही मेडिकलमध्ये कोरोनासाठी लागणार्‍या रेमडेसिव्हीर या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी दबा धरून तेथील ग्राहकांवर पाळत ठेवली होती.

हाके मेडिकलचा चालक ४२०० रुपयांचे इंजेक्शन ६००० रुपयांना विक्री करत असल्याचे आढळून आले. रेमडेसिव्हीर तुटवडा होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक मेडिकल दुकानदारांनी हे इंजेक्शन दाबून ठेवले असून, ओळखीच्या ग्राहकांना तसेच ज्यादा दर देणार्‍या ग्राहकांनाच विक्री करत असल्याने अनेक गोरगरीब रुग्ण या इंजेक्शनपासून वंचित राहू लागले. याप्रकर्णी बुधवारी रात्री जिल्हा प्रशासनाने थेट कारवाई केली.

या प्रकारणी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक बळीराम मरेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवामोंढा पोलिस ठाण्यात विजय हाके व रवी आधारे हे दोघे जण संगणमत करून रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन जीवनावश्यक वस्तू आहे हे माहीत असतानाही त्यावरील छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करत असल्याचे आढळले. शासनाने घालून दिलेल्या औषध किंमत नियमंत्रण आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे तक्रारीत म्हटले.

मेडीकल चालक विजय हाके आणि रवि आधारे या दोघांना नवा मोंढा पोलिसांनी अटक केली. गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले. तेंव्हा न्यायालयाने त्यांना १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

लॉकडाऊनच्या जाचक अटी रद्द न केल्यास ११ एप्रिल रोजी वंचितचे अंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या