27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीवाळू धक्क्यावर पोलिसांची धाड

वाळू धक्क्यावर पोलिसांची धाड

एकमत ऑनलाईन

परभणी : पाथरी तालुक्यातील डाकुपिंप्री शिवारातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या वाळू धक्क्यावर पोलिसांनी बुधवारी (दि.१८) मध्यरात्री धाड टाकून कारवाई केली. यात १३ आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून रेतीचा उपसा कटिंग चोरटी वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे ३ पोकलँड , १ हायवासह १ कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात पोलिस अधीक्षक जयंत मीना व अपर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उप विभागीय पोलिस अधिकारी श्रेणीक लोढा (गंगाखेड) यांना गोपनिय माहिती मिळाली की, पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे डाकुंिपपरी शिवारातील गोदापात्रात मालक व ठेकेदार यांनी संगणमताने रात्रीचे वेळी उत्खनन करण्याचा कोणताही परवाना नसताना रेती चोरी करीत आहेत.

त्यावरून त्या ठिकाणी छापा मारला असता तेथे मालक व ठेकेदार यांनी संगणमताने रात्रीच्या वेळी उत्खनन करण्याचा कोणताही परवाना नसताना रेती ( वाळू ) चोरी करण्याच्या उद्देशाने जाणीवपुर्वक नदीपात्रात उतरून स्वत:च्या आर्थीक फायद्याकरिता रेतीचे उत्खनन करून शासनाचा महसूल कर बुडवून नदी पात्रात एका टोकापासून ते दुस-या टोकापर्यंत वाहत्या पाण्यामध्ये दगड गोटे व मुरूम तसेच वेड्या बाभळीचा लाकडाच्या सहाय्याने पात्रात बंधारा बांधून नदी पात्रात आगळीक केली. त्यामूळे नदीच्या नैसर्गीक प्रवाहास अडथळा निर्माण झाला आहे. तसेच मुरूम व बाभळीचे लाकडाने नदीचे पात्र दूषित करून जे पाणी पिण्यासाठी योग्य आहे ते दूषित करण्यास कारणीभुत झाले आहे.

तसेच गैरपणे पाण्याच्या दिशेत बदल करून व प्रमाणाबाहेर रेतीचे उत्खनन करून शेतीसाठी व पिण्याचे पाण्यामध्ये घट होईल याची त्यांना जाणीव असतांना सुध्दा तशी कृती केली अशा प्रकारचे कृत्य करून नदीचा निचरा प्रक्रीया क्षती पोहचवली हा प्रकार धक्कामालक के. एम. सी. अ‍ॅन्ड कन्सलटन्ट प्रो.प्रा. मोहम्मत मुन्तजीब खान वहीद खान (रा . रोशन मोहल्ला परभणी) व त्याचे साथीदार, उप ठेकेदारांनी

संगणमताने चोरटी रेती उत्खनन व वाहतूक करण्याच्या उद्देशाने केला म्हणून आरोपी मोहम्मद मुन्तजीब खाल वहीद खान ( रा. रोशनखान मोहल्ला परभणी), रेती धक्का ठेकेदार, केशव वाल्मीक मुंडे व इतर १० अशा १३ आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या