25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeपरभणीपोलीसांच्या धाडीत २४ हजाराची विदेशी दारू जप्त

पोलीसांच्या धाडीत २४ हजाराची विदेशी दारू जप्त

एकमत ऑनलाईन

पूर्णा : शहरातील अशोक रोड येथील एका घरा वर स्थानिक पोलिसांनी छापा मारून अवैध रित्या विक्रीस ठेवलेले देशी दारूच्या 480 बाटल्या किंमत 24960 रु चा माल जप्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून मात्र पोलिसांनी टाकलेल्या छापा मध्ये हजारो रुपयांची विदेशी दारू ही सापडली होती परंतु गुन्ह्यात फक्त देशी दारूचं दाखवण्यात आल्याने या बाबत स्थानिक पोलिसा विरोधात शहरात उलट सुलट चर्चा सुरू होती.

दसरा सण निमित्त जिल्हाधिकारी परभणीच्या आदेशाने परवाना धारक देशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे या बंद काळात अवैध रित्या विक्री करण्या करिता दारूचा साठा अशोक रोड येथील एका घरात ठेवल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली या वरून स्थानिक पोलीस पथकाने दि 24 ऑक्टोबर रोजी रात्री 10 30 वाजता छापा टाकुन देशी विदेशी दारू जप्त केली होती परंतु पो उप निरीक्षक गधकवाड याच्या फियार्दी वरून दारू विक्रत्या संजय खडागडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून देशी दारूच्या एकूण 480 बाटल्या किंमत 24960 रु माल जप्त केल्याचे दाखवण्यात आले मात्र धाडीतील विदेशी दारूची एक ही बॉटल दाखल झालेल्या गुन्ह्यात दाखविण्यात आली नाही.

त्यामुळे विदेशी दारू गेली कुठे आशा प्रश्न सर्व सामान्य लोकांना पडला असून पोलीसाची ही कार्यवाही फक्त देखावा तर नही ना अशी चर्चा सुरू असून फक्त स्वस्थ देशी दारूच्या बाटल्याच गुन्ह्यात दाखवून महागडी विदेशी दारू का गुन्ह्यात दाखविली नाही या बाबत शहरात उलट सुलट चर्चा होऊन पोलीसा कार्य पध्द्ती वर प्रश्न चिन्हे निर्माण झाल्याने याकडे परभणीचे नूतन पोलिस अधिक्षक जयंत मिना लक्ष देतील का या कडे पूर्णेकराचे लक्ष लागले आहे विशेष बाब म्हणजे पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे याच्या आशीवार्दाने खुलेआम सर्व अवैध धंदे बोकाळले आहे.

लोजप नाही तिथे भाजपला मत द्या : चिराग पासवान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या