20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeपरभणीपुर्णेतील शासकीय गायरान जमीनीवर होणार पोलिस उपविभागीय कार्यालय

पुर्णेतील शासकीय गायरान जमीनीवर होणार पोलिस उपविभागीय कार्यालय

एकमत ऑनलाईन

पुर्णा : शहरातील शासकीय गायरान जमिनीवर पोलीस उपविभागीय कार्यलय तथा पोलिस ठाण्याची भव्य इमारत बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ या संदर्भात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सदर गायरान जमिनी बाबत अहवाल सादर करण्याचे आदेश नुकतेच पूर्णा तहसीलदार तथा उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयाला दिले आहेत़ त्यामुळे या गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर ही हातोडा पडण्याचे संकेत दिसत आहेत.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, पुर्णा शहरात स.नं.१५८ एकून ३९.३० हेक्टर आर जमीन ७/१२ प्रमाणे आहे. त्यापैकी काही जमीन शासकीय कार्यालयांना प्रदान करण्यात आली आहे़ तसेच पुर्णा येथिल शासकीय सर्वे नंबर १४ च्या ७/१२ वर एकून क्षेत्र १२.१४ हेक्टर आर आहे. यामध्ये काही जमीनीवर बोगस कागदपत्रांच्या आधारे नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचा-यांना हाताशी धरुन काही जमीनीवर पक्क्या बांधकामांसह अतिक्रमण करण्यात आले आहे.

काही जमीन शासकीय कार्यालयांना प्रदान करण्यात आली आहे़ सदरील जागेवर बाकी असलेल्या जागेचा तात्काळ सर्वे करून ही जागा पुर्णेतील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह भव्य पोलिस स्थानकाच्या इमारतीसाठी देण्या संदर्भात जिल्हाधिकिरी गोयल यांनी दि.१२ डिसेंबर रोजी आदेश काढून तहसिलदार टेमकर यांना उपअधिक्षक भुमी अभिलेख पुर्णा यांचेशी संपर्क करुन या प्रकरणी कारवाई तातडीने पुर्ण करावी व केलेल्या कारवाई बाबत अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे लवकरच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पुर्णा पोलिस स्थानकाच्या सुसज्ज इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे दिसून येत आहे़

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या