26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home परभणी परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायतसाठी मतदान शांततेत

परभणी जिल्ह्यात ग्रामपंचायतसाठी मतदान शांततेत

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.15) मतदान प्रक्रिया सायंकाळपर्यंत किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली. सकाळ पासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले. परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यातील ४९८ ग्रामपंचायतसाठी शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रथमच ग्रामिण भागात या निवडणुका होत असल्याने प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती. सकाळी मतदानाला सुरूवात होण्यापुर्वीच मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. या निवडणुकीत महिला व नागरिकांचा मोठा उत्साह दिसून आला.

जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतमध्ये ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली. प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली होती. गेल्या आठ दिवसांपासून रात्रंदिवस उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. गाव पुढारी देखील आपल्याच पॅनलची सरशी व्हावी यासाठी प्रयत्न करत होते. ग्रामिण भागात नव मतदार असलेल्या युवक व युवतींनी प्रथमच आपला मतदान हक्क बजावला. यावेळी त्यांनी गाव विकासासाठी योग्य त्या उमेदवाराची निवड व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून गावात नागरिकांना मुलभूत सुविधा ग्रामपंचायतकडून पुरवल्या जाव्यात असे मत व्यक्त केले.

परभणी जिल्ह्यात ५६६ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ६८ ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्या गेल्या. तर उर्वरित ४९८ ग्रामपंचायतीसाठी आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत ४ हजार ७१९ जागांसाठी ९ हजार ४३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशिब अजमावत आहेत. सकाळ पासूनच मतदारांचा उत्साह पाहता सायंकाळी उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. परभणी तालुक्यातील मुरूंबा येथे काही दिवसापुर्वीच बर्ड फलयूची लागन झाली होती. या पार्श्वभुमीवर या ठिकाणी झालेल्या आजच्या निवडणुकीत तेथील मतदारांनी मोठ्या उत्साहात यात सहभाग नोंदवला.

धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदावरील गंडांतर टळले !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या