22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeपरभणीमान्सुनपूर्व पावसाने रस्त्यांची दुरावस्था

मान्सुनपूर्व पावसाने रस्त्यांची दुरावस्था

एकमत ऑनलाईन

परभणी : मान्सुनपूर्व पावसाने शहरासह जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. सद्यस्थितीत परभणी- गंगाखेड महामार्गाचे काम सुरू असून पावसानंतर या रस्त्याला तळ्याचे स्वरूप येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणा-या वाहनचालकांना पाण्यातून रस्ता शोधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तातडीने या मार्गाचे काम पूर्ण न झाल्यास संपूर्ण पावसाळा प्रवाशांना महामार्गावरून प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

मान्सुनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. परंतू परभणी- गंगाखेड महामार्गासह शहरातील उघडा महादेव रोड, जिंतूररोड, मानवतरोड आदि मार्गाची दुरावस्था झाली आहे. जिंतूर मार्गाचे कामही गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या मार्गावरून येणा-या – जाणा-या वाहनांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी अनेक वाहने रस्त्यावरील चिखलात अडकली होती. तरी देखील या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात आले नाही.

या रस्त्या प्रमाणे मानवतरोड रस्त्याची अवस्था असून जागोजागी पाणी साचत आहे. तसेच गंगाखेड रस्त्यावर जागोजागी पाणी साचल असल्याने प्रवाशांना यातून मार्ग काढताना नाकीनऊ येत आहेत. याकडे संबंधित विभागाने तातडीने लक्ष देवून संबंधित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरीक करीत आहेत.

कच्चे तेल स्वस्त; दरवाढ जबरदस्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या