26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeपरभणीमहाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रविण लुंकड

महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रविण लुंकड

एकमत ऑनलाईन

परभणी : महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन च्या वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ९ नोंव्हेबर रोजी शारदा सेंटर पुणे येथे संपन्न झाली. या सभेत पदाधिकारी आणि कार्यकारिणी समिती सदस्यांची वर्ष २०२२-२०२६ पर्यंतची कार्यकारिणीची निवड करण्यात आली . केंद्रीय मंत्रालयांच्या मान्यतेने स्पोर्ट्स कोड नुसार महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या घटनेत बदल करून राज्य पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्या निवड करण्यात आली.

यात अध्यक्ष, महासचिव, सचिव, कोषाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चार उपाध्यक्ष पदाधिकारी साठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यात नरेंद्र चव्हाण यांना १८ मते, गणेश मंगळूकर: १५ मते, आशिष बोडस – १५ मते तर शिवाजी सरोदे – १४ मतांनी विजयी झाले. २०२२-२६ पर्यंत ची पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्या निवड निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. शंशाक वाघ यांनी काम पाहिले.

प्रविण लुंकड (अध्यक्ष) नरेंद्र चव्हाण (नांदेड),आशिष बोडस(पुणे) गणेश मंगरुळकर (अकोला) शिवाजी सरोदे (जळगांव) सर्व उपाध्यक्ष यतीन टिपणीस महासचिव (ठाणे), अ‍ॅड. आशुतोष पोतनीस सचिव (नागपूर) , संजय कडू (रायगड ) खजिनदार गणेश माळवे (परभणी) अशोक राऊत (यवतमाळ ) कुलजीत सिंग दरोगा (औरंगाबाद) सुभाष देसाई (कोल्हापूर) तर २५% स्पोर्ट्स कोट्यातून शेखर भंडारी (नाशिक) अजित गाळवणकर (पुणे) महेंद्र चिपळूणकर (मुंबई शहर) कमलेश मेहता( मुंबई) कार्यकारिणी समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी डॉ.प्रकाश तुळपुळे, राजीव बोडस, नरेंद्र छाजेड, कमलेश मेहता, स्मिता बोडस , विविध जिल्यातील पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या