23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeपरभणीपरभणी शहरात जोरदार पावसाची हजेरी

परभणी शहरात जोरदार पावसाची हजेरी

एकमत ऑनलाईन

परभणी : शहरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवार दि. २८ जून रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते.

परभणी शहरासह जिल्ह्यात पावसाळा सुरुवात झाल्यापासून अद्याप जोरदार पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे १ जूनपासून आतापर्यंत १३३.४ मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. शहरासह जिल्ह्यात मंगळवारी रात्री आठ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अर्ध्या तासात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पावसाच्या जोरदार आगमनामुळे शेतक-यांसह नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या