22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeपरभणीपरभणीत दुस-या दिवशी पावसाची हजेरी

परभणीत दुस-या दिवशी पावसाची हजेरी

एकमत ऑनलाईन

परभणी/प्रतिनिधी
शहरासह जिल्ह्यात बुधवार, दिÞ२२ जून रोजी सायंकाळी ०७ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावलीÞ साधारण १५ मिनीटे झालेल्या पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचले होतेÞ दरम्यान काल मंगळवारी देखील जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होतीÞ पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली असल्याने शेतक-यांत समाधानाचे वातावरण दिसून येत आहेÞ पावसाच्या हजेरीमुळे पेरणीच्या कामांना वेग आल्याचे दिसून येत आहेÞ

शहरात बुधवारी सायंकाळी ०७ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावलीÞ जवळपास १५ मिनीटे मध्यम स्वरूपात झालेल्या या पावसामुळे सखल भागात मात्र पाणी साचल्याचे दिसून आलेÞ तसेच काल मंगळवारी देखील रात्री ०८ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होतीÞ साधारण ०१ तास मध्यम स्वरूपात झालेल्या या पावसामुळे नागरीकांसह शेतक-यांना दिलासा मिळालाÞ दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने पुढील दोन दिवस औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहेÞ गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला आहेÞ तसेच नागरीकांसह शेतक-यांत समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहेÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या