परभणी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय आयोजित १९व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत शुक्रवार, दिÞ०६ जानेवारी रोजी गोपाला फाऊंडेशन परभणीच्यावतीने जाईच्या कळ्या या बालनाट्याचे सादरीकरण झाले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय तर्फे आयोजित १९वी राज्य बालनाट्य स्पर्धा दि.०५ व ०६ जानेवारी रोजी कुसुम नाट्यगृह केंद्र नांदेड येथे पार पडली. परभणीच्या गोपाला फाऊंडेशन प्रस्तुत बालाजी दामूके निर्मित, धनंजय सरदेशपांडे लिखित व रवि पाठक दिग्दर्शित जाईच्या कळ्या या बालनाट्याचा प्रयोग झाला. परीस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित राहिलेली डोंबारीन मुलगी मुन्नी आणि शिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी सुमी यांच्या मैत्रीवर भाष्य करणारे हे नाटक असून या नाटकात स्वरा कुलकर्णी, श्रीया लव्हेकर, भाग्यश्री उन्हाळे, सई चिटणीस, श्लोक देशपांडे, उन्नती औढेंकर, सृजन संघई या बालकलाकारांनी अभिनय केला आहे. नेपथ्य अतुल साळवे, प्रकाश योजना बालाजी दामूके, नारायण त्यारे, संगीत गोंिवद मोरे, रंगभूषा तेजस्विनी दामूके, वेशभूषा रुपाली पाठक, पोस्टर संरचना सिद्धार्थ नागठाणकर यांचे असून रंगमंच व्यवस्था हरिभाऊ कदम, सोहम खिल्लारे यांनी पाहिली.
नांदेड केंद्रावर एकूण ०९ नाटकांचे सादरीकरण झाले. या नाटकाच्या यशासाठी संतोष खराटे अध्यक्ष गोपाला फाऊंडेशन परभणी, ऍड़पवन निकम, विनोद लोहगावकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी यांनी शुभेच्छा दिल्या. उद्योजक बंडु नाना सराफ, अभिजित सराफ यांचे विशेष सहकार्य लाभले.