26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home परभणी परभणी मेडीकल कॉलेजच्या जागेचा प्रस्ताव अर्थखात्याकडे रवाना

परभणी मेडीकल कॉलेजच्या जागेचा प्रस्ताव अर्थखात्याकडे रवाना

एकमत ऑनलाईन

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निश्चित केलेल्या गोरक्षण जागेचा प्रस्ताव उद्योग मंत्रालयाव्दारे अर्थखात्याकडे तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती खासदार श्रीमती फौजिया खान व माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे यांनी दिली.राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची श्रीमती खान व अ‍ॅड. गव्हाणे यांनी गुरुवारी (दि.७) मुंबईत मंत्रालयात भेट घेतली. या भेटीतून या दोघांनी उद्योगमंत्री देसाई यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मराठवाडा विकास मंडळाअंतर्गत दुय्यम कंपनीची म्हणजे गोरक्षणची जमीन हस्तांतरित करण्यास परवानगी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी देसाई यांनी या अनुषंगाने अर्थखात्याकडे तांत्रिक मान्यतेकरिता प्रस्तावसुध्दा पाठवण्यात आल्याची माहिती दिली.

दरम्यान, श्रीमती खान व अ‍ॅड.गव्हाणे यांनी उद्योगमंत्री देसाई यांच्याबरोबर अन्य विकास प्रश्नांबाबतची चर्चा केली. विशेषत: औद्योगीक वसाहतीकरिता जागा उपलब्ध करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली़ गोरक्षणची सर्वसाधारणपणे चारशे एक्कर जागा उपलब्ध आहे. त्यापैकी काही जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास तर उर्वरित जागा औद्योगीक वसाहतीकरिता उपलब्ध करण्याचा निर्णयसुध्दा उद्योगमंत्रालयाव्दारे घेण्यात आल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. यावेळी अप्पासाहेब बालवडकर उपस्थित होते.

लस पोहोचवण्यासाठी वायूदल सज्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या