Thursday, September 28, 2023

संजय राऊत यांच्या निषेधार्थ आंदोलन

परभणी : शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शनिवार, दि.०३ जून रोजी निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच राऊत यांच्या प्रतिकात्मक फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी पूर्णा शहरातही राऊत यांच्या प्रतिकात्मक छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरात झालेल्या या आंदोलनात शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, दलित आघाडी जिल्हाप्रमुख धम्मदीप रोडे, चेतन चारण, राहुल शिंदे, बाळासाहेब पाणपटे, गोटू मुरकुटे, भैया कानडे, वैभव सरोदे, सागरसिंग टाक, विक्रम शिंदे, बालाजी चोपडे, सतीश अवकाळे, आजू शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान पूर्णा येथेही राऊत यांच्या बेताल कृताच्या विरोधात शनिवारी सकाळी ११ वाजता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख माधवराव कदम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केले.

यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी विधानसभा प्रमुख चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख एकनाथराव काळबांडे, तालुकाप्रमुख प्रकाशराव काळबांडे, शहरप्रमुख विशाल किरडे, युवाशहर प्रमुख अंकित कदम, उपशहरप्रमुख लक्ष्मण कदम, गजानन कदम, सतीश कदम, अविनाश रेंगे, गोपाळ बोबडे, बंटी बोबडे, संतोष खंदारे, महिला तालुकाप्रमुख संगीता पुरी, गीता बायस यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या