22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeपरभणीमहावितरण कार्यालयातील अभियंता, कर्मचारी निलंबन विरोधात ठिय्या आंदोलन

महावितरण कार्यालयातील अभियंता, कर्मचारी निलंबन विरोधात ठिय्या आंदोलन

एकमत ऑनलाईन

जिंतूर : शहरातील महावितरण कार्यालयातील उपअभियंता व एका कर्मचा-याला औरंगाबाद येथील महावितरणाच्या पथकाने निलंबित केले आहे़ या विरोधात महावितरणाच्या अनेक कर्मचा-यांनी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी करत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

या प्रकरणी आंदोलनकर्त्यांनी दिलेली माहिती अशी की, जिंतूर शहरातील जालनारोड परिसरात दि.२१ ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथील पथकाने एका ग्राहकाने वीज चोरी केल्या प्रकरणी शहर उपअभियंता सचिन कोळपे व वरिष्ठ तंत्रज्ञ जीवन मुुरशीटवाड या दोन जणांना निलंबित केले़ या विरोतधात संतप्त वीज वितरण कर्मचा-यांनी बुधवार, दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत या परिसरात जोरदार घोषणाबाजी केली.

जोपर्यंत निलंबनाची कारवाई मागे घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलनातील कोणताही कर्मचारी कामावर जाणार नसल्याचा पावित्रा या आंदोलकांनी घेतला़ या आंदोलकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे़ यावेळेस कर्मचा-यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या