26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeपरभणीआरटीओ कार्यालयाकडून रस्ते सुरक्षा संदर्भात जनजागृती

आरटीओ कार्यालयाकडून रस्ते सुरक्षा संदर्भात जनजागृती

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील आरटीओ कार्यालयाकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती संवेदना जागविण्यात आल्या. तसेच स्वत:चा व आपल्या कुटूंबीयांचा अपघातापासून बचाव करा असे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्टँड परीसरात रस्ते सुरक्षा संदेश देणा-या पुस्तिकेचे वाटप करून उपस्थितांना रस्ते सुरक्षे संदर्भात आरटीओ कार्यालयातील अधिका-यांनी माहिती दिली.

अपघात मुक्त कुटुंब सुरक्षित कुटुंब या दिवसाचे औचित्य साधून परभणी आरटीओ कार्यालयाकडून परभणी शहरातील गर्दीच्या विविध ठिकाणी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती संवेदना जागविण्यात आल्या. अशा कुटुंबीयांची मनोगते झाली. अपघाताचे गांभीर्य, कुटुंबावर होणारा परिणाम याची या सर्वांना जाणीव करून देण्यात आली. रस्ते सुरक्षा शपथ देखील त्या निमित्ताने सर्वांकडून वदवून घेण्यात आली. रस्ते सुरक्षा संदेश देणारी माहिती पुस्तिकेचे देखील वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात डेप्युटी आरटीओ श्रीमती अश्विनी स्वामी व एआरटीओ नकाते यांच्या मार्गदर्शनात देवरे मोवानी, अंकामवार, श्रीमती फुलपगार, ढगे, कांबळे यांनी योगदान दिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या