30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीमहाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय मोजतात शेवटच्या घटका

महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय मोजतात शेवटच्या घटका

एकमत ऑनलाईन

जिंतूर: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची सन २०२०-२१ या वर्षातील मार्च महिन्यात मिळणा-या दुस-या टप्प्याचे परीक्षण अनुदान केवळ सहा टक्के मिळाल्याने राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय शेवटच्या घटका मोजत आहे. राज्याच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या मूळ अंदाज पत्रकात सार्वजनिक ग्रंथालयाच्या आधीच कमी असलेल्या अनुदानात कपात केली असून कोणतीही पुरवणी मागणी वित्त विभागाने मंजूर केली नाही. चालू वित्तीय वर्षात १५६ कोटी ४ लाख ३३ हजार रुपये तरतूद आवश्यक होती. ती मंजूर झाली नाही.

या आर्थिक वर्षात सन २०१९-२० मधील थकीत दुसरा हप्ता ३२ कोटी २९ लाख रुपये चालू वर्षात दोन हप्त्यात देण्यात आला. गेल्या वर्षीचा पहिला हप्ता शासनाने पूर्ण दिला. परंतु दुस-या टप्प्यातील अनुदान मार्चपर्यंत पूर्ण मिळण्याची अपेक्षा असताना ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचा-यांना ते अनुदान केवळ सहा टक्केच शासनाने देत ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी शासनाने नुसती बोळवण केली. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांना सन २०२० व २१ या आर्थिक वषार्तील अनुदान ९४ टक्के अद्यापही मिळणे बाकी असल्याने राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय पदाधिका-यांना ग्रंथालय चालवणे मोठे जिकरीचे झाले आहे.

त्यामुळेच शहरी भागासह ग्रामीण भागातील ग्रंथाने चालविणे कठीण झाली आहे. या ग्रंथालय मध्ये अ, ब, क, ड अशाप्रकारे वर्गवारी करून अनुदान दिले जात असल्याने अनेक कर्मचा‍-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यापैकीच ड वर्गाच्या ग्रंथालयात केवळ तीस हजार रुपये वार्षिक अनुदान दिले जात असल्यामुळे त्यास ३० हजारांमध्ये दैनिक खरेदी करणे, मासिक खरेदी करणे, लाईट बिल, ग्रंथालयाचे भाडे, प्रवास खर्च, ईतर कार्यक्रम, ग्रंथपालाचा पगार व इतर खर्च करावा लागत असल्याने ड वर्गाच्या ग्रंथालयास तारेवरची कसरत करावी लागत आहे. तरी शासनाने ग्रंथालयाचे थकीत अनुदान त्वरित द्यावी अशी मागणी ग्रंथालय कर्मचारी वर्ग मधून केली जात आहे.

सन 2012 पासून सदरील ग्रंथालयाचे दर्जाबद्दल बंद असल्यामुळे ड वगार्तील ग्रंथालय अद्यापही ड वर्गातच असल्याने कर्मचारी दर्जा बदल होण्याची आशा पाहून आहे .त्या परिस्थितीत आपले आर्थिक जीवन जगत आहे. तरी शासनाने दर्जा बदल करावा अशीही मागणी ग्रंथालय कर्मचा-यामधून केली जात आहे
– मंचक जगताप, जिल्हा प्रमुख,
महाराष्ट्र ग्रंथालय सेना

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पांना कोरोना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या