35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeपरभणीपुर्णेत भरधाव कारने दोघांना चिरडले

पुर्णेत भरधाव कारने दोघांना चिरडले

एकमत ऑनलाईन

पूर्णा : शहरातील नगर पालिका कार्यलय समोरील रस्त्यावरून जाणा-या एका कार चालकाने भरधाव वेगात कार चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन युवकांना चीरडल्याची घटना शनिवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही युवकास गंभीर मार लागल्यामुळे त्यांना नांदेड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर कारचालक दारुच्या नशेत असल्याचे उघडकीस आले आहे.

प्रत्यक्षदर्शी कडुन मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नगर परिषद कार्यालय परीसरातील रस्त्यावर येथिल सुशांत पिराजी दुधे व स.रिजवान स. बाबा व अन्य दोघे मित्र हे रस्त्याच्या कडेला आपली दुचाकी लाऊन एका बाकड्यावर मोबाईल पहात बसले होते.याचवेळी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुख्य रस्त्यावरून पालीकेच्या रोडकडे एम.एच.२२ के. २६२६ ही कार भरधाव वेगाने आली. काही समजण्याच्या आतच बाकड्यावर या भरधाव कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. त्यानंतर बाकड्यावर बसलेल्या चार जणांपैकी दोघांना या कारने आपल्या कवेत घेतले. यावेळी सुशांत पिराजी दुधे १८ वर्षे व स. रिजवान स.बाबा वय १३ वर्षे दोघे रा.शास्त्रीनगर पुर्णा हे कार खाली चिरडल्या गेले. अपघात इतका जोराचा होता की दोघांना कार खालुन खेचुन बाहेर काढावे लागले.

अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. कारचालक दारुच्या नशेत असल्याने हा अपघात घडल्याचे लक्षात येताच घटनास्थळी जमलेला जमाव संतप्त झाला होता. अपघात एवढा भिषण होता की, जखमींना कारखालून बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठे प्रयत्न करावे लागले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नगरसेवक अ‍ॅड. हर्षवर्धन गायकवाड, शेख खुद्दुस शेख बशिर, सामाजिक कार्यकर्ते अयुब कुरेशी, विशाल कांबळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावास पोलिसांनी शांत केले. त्यानंतर पोलिसांनी कार चालकास ताब्यात घेतले. घटनास्थळी पंचासमक्ष पंचनामा करून पोलिसांनी अपघात ग्रस्त वाहन ताब्यात घेतले. जखमीवर नांदेड येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आता ‘पीयूसी’ नसल्यास वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र जप्त होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या