27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home परभणी पुर्ण्यात आयपीएल सट्टा बुक्कीवर धाड

पुर्ण्यात आयपीएल सट्टा बुक्कीवर धाड

एकमत ऑनलाईन

पुर्णा : पुर्णा शहरातील कमल टॉकीज समोरील धुत साडी सेंटरच्या दुस-या मजल्यावर बेकादेशीरपणे चालत असलेल्या आयपीएल सट्टा बुक्कीवर स्थानिक पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपी सह २ लाख ५७१३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले आहे. पूर्णा शहरातील महाविरनगर परिसरात आयपीएल फाईनलचा सट्टा चालत असल्याची माहिती मिळाली या वरून दि. १० नोव्हेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास पोलिस निरिक्षक गोवर्धन भुमे याच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धुमाळ, पोलीस उपनिरिक्षक गुट्टे, मारकवाड, गिरीष चनावार, समीर पठाण, महिला पोलीस कर्मचारी स रफत या पथकांनी कमल टॉकीज समोरील धूत साडी सेंटरच्या वरच्या मजल्यावर धाड टाकली असता त्या ठिकाणी टीव्हीवर आयपीएलचा मुबंई आणि दिल्ली यांचा फाईनल मॅच सुरू होता आणि तेथील चार तरुण लोकांकडून मोबाईलद्वारे सट्टा खेळत होते.

आपल्या जवळील रजिस्टर मध्ये नोंद करत होते या तिघां तरुणास पोलिसांनी ताब्यात घेऊन घटनास्थळावरून अकरा मोबाईल, लॉपटॉप, एलसीडी टीव्ही, पॅनड्राइव्ह व रोख एक लाख १८ हजार १३० रूपये जप्त केले. सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रवीण धुमाळ यंच्या फियार्दी वरून सचिन वाघमारे, कृष्णा ओझा, रामप्रकाश धूत, गोलू धूत यांच्या विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात कलम ४.५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक गुट्टे हे करीत आहेत.

विकासरत्न विलासराव देशमुख साखर कारखान्यात ऊसाच्या रसापासून थेट ईथेनॉल निर्मीती होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या