24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीआयटीआयतर्फे सायकल दिनानिमित्त रॅली

आयटीआयतर्फे सायकल दिनानिमित्त रॅली

एकमत ऑनलाईन

परभणी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे शुक्रवार, दि.०३ जून रोजी राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन प्राचार्य एस.व्ही. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

ही रॅली आयटीआय ते विसावा कॉर्नरपर्यंतच्या भागात काढण्यात आली. त्या अनुषंगाने सायकलच्या वापरातून आरोग्याविषयी आणि पर्यावरण विषयी जागृती, इंधन व पैसे बचतीचे महत्व फलक आणि घोषवाक्याच्या माध्यमातून जनतेला पटवून दिले. या रॅलीचे नियोजन गट निदेशक भातलवंडे यांनी केले. रॅलीत मोरे, काचगुंडे तसेच कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे डी.डी. घोडके, एस.जी. जाधव, एस.बी. छापरवाल, इंगेवाड, कोरडे, शिरजोशी, सपकाळ, देशमुख यांच्यासह कोतवाली पोलिस ठाणे व वाहतूक शाखा यांचे सहकार्य लाभले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या