राणीसावरगाव : येथील ग्रामपंचायतने, दुकान भाड्यासाठी शुक्रवारी एका दुकानाला सील ठोकले. परंतू आपल्याला कोणतीही सुचना न देता हे सील ठोकण्यात आलाचा आरोप दुकानदार शेख गफार यांनी केला आहे. त्यांनी या कारवाईचा विरोध करीत गावातील काही नागरिकांना सोबत घेवून ग्रामपंचायतला कुलूप ठोकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयाकडून मासीक सभेमध्ये ठराव घेऊन ग्रामपंचायतची गावातील घरपट्टी, नळपट्टी, दुकान भाडे वसुली मोहीम सुरू आहे. काही दिवसापूर्वी वसुली मोहिमांतर्गत नोटीसा देऊन ब-याच दुकानांना सील मारण्यात आले होते. काल दि.०७ एप्रिल रोजी या मोहिमेंंतर्गत शेख गफार यांच्या दुकानात ग्रामसेवक कुंडगीर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सील मारले आहे.
शेख गफार यांनी मला ग्रामपंचायतकडून कुठल्याच प्रकारची नोटीस अथवा फोन न करता केवळ चालू बाकी बाराशे रुपये भरले नाही म्हणून दुकानाला सील मारले व माझी मानहानी केली म्हणून शेख गफार नागेश जाधव तसेच आणि काही नागरिकांनी येऊन ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले. मला कुठलीच नोटीस न देता दुकानाला सील लावणे हे चुकीचे व बेकायदेशीर आहे असे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील नागरिक ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.