23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeपरभणीबाधीत व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांच्या होणार रॅपीड टेस्ट

बाधीत व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांच्या होणार रॅपीड टेस्ट

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोना महामारीचा कहर सुरुच असून दिवसेंदिवस जिल्हयात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. नागरिकांनी शासना्च्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच रॅपिड अँटीजेन टेस्‍ट करून घ्‍यावी शहरात आढळून आलेल्‍या सर्व बाधित रुग्‍णाच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती व घराच्‍या शेजारी असणारे कुटुंबातील व्‍यक्‍तींची शनिवार १२ सप्टेबर पोसून रॅपिड अँटीजेन टेस्‍ट केली जाणार आहे त्यासाठी नागरिकांनी सहकार्य कर.ण्याचे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.

यासाठी फिरती रुग्णवाहिका बाधित रुग्‍णाच्‍या संपर्कातील संबंधित व्‍यक्‍ती व घराच्‍या शेजारी असणा-या कुटुंबात यांच्‍या घरी जाऊन त्‍यांची रॅपिड अँटीजेन टेस्‍ट करणार आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रतिबंध करण्‍यासाठी व आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्‍यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्‍ट करून घ्‍यावी.

जिल्ह्यात आज कोरोनाबाधित चौघांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या १४५ वर पोचली. आज दिवसभरात ८३ रुग्ण आढळले. बाधितांचा आकडा तीन हजार ८४८ झाला आहे. त्यातील दोन हजार ९०९ रुग्ण बरे झाले आहेत. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट होणार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सवर्साधारणपणे कोरोना रुग्‍णाच्‍या थेट संपर्कातील व्यक्ती व शेजारी कुटुंबांतील नागरिकांच्या रॅपिड टेस्ट घेतल्या जाणार असून शनिवारपासून १२ पासून या टेस्टला सुरवात होणार आहे.

महापालिकेने कोरोना बाधित व्यक्तीच्या सहवास व संपर्कात आलेल्या हायरिस्क व लोरिस्क व्यक्तींमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु त्‍यांची तपासणी केल्‍यानंतर ते पॉझिटिव्‍ह आढळून येतात. ज्‍यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी बाधित व्‍यक्‍तीच्‍या सहवासात, संपर्कात आलेल्‍या व शेजारी कुटुंबातील व्‍यक्‍तींची केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे पालिकेने या टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अशा व्यक्तींना पाच दिवसांनंतर रॅपिड अँटीजेन टेस्‍ट करावी लागणार आहे.

घरीच विलगीकरणाची संधी ज्‍या नागरिकांची कोरोना टेस्‍ट पॉझिटिव्‍ह येईल त्‍या पात्र रुग्‍णांना घरी आवश्‍यक सोयी-सुविधा असल्‍यास त्‍यांना घरीच विलगीकरणाची संधी देण्‍यात येईल; तसेच त्‍यांच्या कुटुंबातील व्‍यक्‍तींना घरी आवश्‍यक सोयीसुविधा असेल तर त्‍यांना विलगीकरणाची संधी देण्‍याचा दावा पालिकेने केला आहे.

आयटीआय मधील क्वारंटाईन रुग्णांची गैरसोय
जिल्हा शासकीय रुग्णालयाने उभारलेल्या जिंतूर रस्त्यावरील आयटीआयच्या नवीन इमारतीतील कोरोना सेंटरमध्ये जिल्हा व आरोग्य प्रशासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला मात्र बाधितांसह कॉरंटाईन केलेल्या व्यक्तींना नेमके स्नानासाठी थंड पाण्यावरच अलंबुन रहावे लागत आहे.

सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाने बाधितांसह कॉरंटाईन केलेल्या व्यक्तींसाठी केलेल्या व्यवस्थांची आरोग्य उपसंचालकांसह खुद्द पालकमंत्र्यांनी मुक्त कंठाने कौतुक केले. या केंद्रात रुग्णांना प्यावयास गरम पाणी, स्नानास गरम पाणी, दोन वेळा काढा या व्यतिरीक्त योगा, मनोरंजनात्मक कार्यक्रम वगैरे राबवल्या जात आहेत. त्या धर्तीवरच परभणीतील केंद्रात किमान कोरोनाबाधित रुग्णास सकस व गरम पदार्थ, पाणी देणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभाग सातत्याने सांगत आहे.

पाणी प्यावयाचे असेल तर तेही गरमच प्यावे, हा निकष आहे. मग स्नानासाठी तर नक्कीच गरमच पाणी हवेना… मात्र, जिंतूर रस्त्यावरील आयटीआय परिसरातील भल्या मोठ्या कोरोना सेंटरमध्ये याबाबत दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर येत आहे. येथील सेंटरमध्ये 200 बेडची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. सद्यस्थितीत येथे 132 रुग्ण उपचारार्थ दाखल करण्यात आलेले आहेत. परिसरात समोरच ऑक्सीजन प्लँट उभारण्यात आला आहे. येथील रुग्णांनाही वेळोवेळी जेवण, नाष्टा दिल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, पहाटे कोरोनाबाधित रुग्णांना स्नानासाठी गरम पाणीच नसल्याचे रुग्ण सांगत आहेत. सद्यस्थितीत 132 रुग्ण येथे आहेत. मात्र, त्यातील क्वचितच रुग्ण स्नान करत असावेत.

कारण येथे गरम पाणीच उपलब्ध करून न दिल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. स्नानाविनाच रहावे लागत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. दात आहेत तर चणे नाहीत… अन् चणे आहेत तर दात नाहीत, अशीच काहीशी स्थिती येथे असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे आरोग्यावर निश्र्चितच विपरित परिणाम होऊ शकतो. तर बरेच जण थंड पाण्यानेच स्नान करून पुन्हा आजारांना निमंत्रण देत आहेत. जिल्हा व आरोग्य प्रशासनाने कोरोना सेंटरवर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र, गरम पाण्याबाबतीतच दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बोगस काम करणाऱ्या कन्ट्रक्शन कंपनीवर कार्यवाहीसाठी शेकाप चा रास्तारोको

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या