18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeपरभणीस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसासाठी एफआरपी ३५० रूपये जाहीर करावीÞ तसेच काही साखर कारखान्यांनी शेतक-यांना शेअरची अट घातली असून ही सुलतानी अट तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवार, दिÞ१४ नोव्हेंबर रोजी सिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेÞ यावेळी आंदोलकांनी नुकसानग्रस्त शेतक-यांना पीकविमा आणि अतिवृष्टीची रक्कम तात्काळ देण्यात यावा अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केलीÞ

खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दरासाठी आंदोलन सुरू झाले आहेÞ या आंदोलनातील प्रमुख मागणी ऊसाला एक रकमी एफआरपी ३५० रूपये देण्यात यावी अशी आहेÞ परभणी जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपी जाहीर केलेली नाहीÞ उसाचे भाव जाहीर करण्यापूर्वी गाळप सुरू करण्याचा डाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहेÞ तसेच काही कारखान्यावर शेतक-यांना शेअरची अट घालून ऊस तोडणी व ऊस लागवड नोंदी घेण्यास नकार देत आहेतÞ ही सुलतानी अट तात्काळ रद्द करण्यात यावीÞ जे कारखाने एफआरपी ३५० रुपये दर जाहीर करणार नाहीत त्या कारखान्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाची सुरुवात करणार असून १७ व १८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व कारखान्याचे ऊस तोडणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच जिल्ह्यातील काही मंडळांना पीक विम्याचे अग्रीम देण्यात आली आहेÞ मात्र उर्वरित रक्कम आपत्तीग्रस्त शेतक-यांना अजून मिळालेली नाहीÞ जिल्ह्यातील बहुसंख्य शेतक-यांनी नुकसानीच्या तक्रारी पिकविमा कंपनीकडे केल्या आहेतÞ त्यांची पाहणी पंचनामे झाले नाहीत आणि कोणतेही नुकसानग्रस्त पीक जागेवर राहिलेले नाहीÞ मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे विमा कंपनीने पंचनामे केलेले नाहीतÞ या सर्व शेतक-यांना पीक विम्याची संपूर्ण रक्कम तात्काळ वाटप करण्याच्या मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी केली आहेÞ

ंिसगणापूर फाटा येथे आज झालेल्या रास्ता रोको आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य वाशिम दामू अण्णा इंगोले, नामदेव पतंगे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भगवान शिंदे, भास्कर खंिटग, मुंजाभाऊ लोंढे, गजानन तुरे, शेषेराव शेळके, रामभाऊ आवरगंड, बाळासाहेब घाटोळ, प्रसाद, गरुड पंडित, अण्णा भोसले, अंकुश शिंदे, बाळासाहेब गरुड, माऊली शिंदे, रामप्रसाद गमे, पांडुरंग दुधाटे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेÞ या रास्तारोको आंदोलनात शेतक-यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला होताÞ या रास्ता रोकोमुळे वाहतूक विस्कळीत झाली होतीÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या