22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeपरभणीआरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको

आरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको

एकमत ऑनलाईन

परभणी : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाज बांधवांच्या विविध सामाजिक संघटनांनी सोमवारी दि.२१ रोजी वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवन समोर रास्तारोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक पाऊनतास ठप्प झाली होती. संतप्त कार्यकर्त्यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात राज्य व केंद्राने निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनात गोविंदराव यादव, चक्रधर उगले, नानासाहेब राऊत, अनिल गोरे, डॉ.सुनील जाधव, तुकाराम गुंगे, किरण सोनटक्के,नंदाताई राठोड, सुधाकर आंदोले, सुभाष पांचाळ, बबन मुळे, अंगद बनसोडे, अ‍ॅड.आर.एन. गायकवाड, सुदर्शन बोराडे, डॉ. विठ्ठल घुले, दिगंबर जाधव, अ‍ॅड. आर.एन. गायवकवाड, गोपीनाथ राठोड, डॉ.मदन लांडगे, चंद्रकांत डहाळे, श्रावण देशमुख, सुधाकर आंदोले, राणोबा मेहेत्रे, गंगाधर यादव, दत्तात्रय मायंदळे, मुंजाभाऊ गायकवाड, शेषराव थोरात, डॉ.गोविंद कामटे, प्रभाकर कु‍-हे, वाजेद कुरेशी, तहेसीन देशमुख, सय्यद दाऊद अली, मतीन तांबोळी, नानासाहेब निकाळजे, अरुण हारकळ, भारत मुंजे, विश्‍वनाथराव थोरे, कृष्णा कटारे या विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अन्य मंत्र्यांना निवेदन पाठविले. या निवेदनात स्थानिक स्वराज्य संस्थातील राजकीय आरक्षण कायम ठेवावे. जनगनना जात निहाय करावी यासह १९ मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलकांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे वसमतरोड परीसर दणाणून गेला होता.

पर्यटन उद्योगाच्या मरणकळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या