23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीभाजपाद्वारे पोखर्णीत रास्तारोको

भाजपाद्वारे पोखर्णीत रास्तारोको

एकमत ऑनलाईन

परभणी : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवार दि. १९ मे रोजी परभणी ते गंगाखेड या मार्गावरील श्री नृसिंह पोखर्णी फाट्यावर जोरदार रास्तारोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला होता. या रास्तारोको आंदोलनामुळे रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा मोठ्या रांगा लागल्या होत्या.

आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून जोरदार घोषणाबाजी केली. मध्यप्रदेश सरकारने आरक्षण टिकवले, परंतु महाराष्ट्रातील सरकार आरक्षण टिकवू शकले नाही, अशी खंत या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. भाजपाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवत गाडगीळ, शिवाजीराव मोहाळे, माधवराव चव्हाण, बाबा पठाण, आकाश लोहट, नवनाथ वाघ, सुरेश भुमरे, बंडू सोरेकर, मुंजा गायकवाड, दत्तराव कच्छवे यांच्यासह अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या