24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeपरभणीओबीसी आरक्षणासाठी रास्तारोको आंदोलन

ओबीसी आरक्षणासाठी रास्तारोको आंदोलन

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. यामुळे तीव्र नाराजी पसरलेल्या ओबीसी समाजाने आरक्षण परत देण्याच्या मागणीसाठी परळी नाका येथे जोरदार रास्तारोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी ओबीसींचे आरक्षण रद्द करणे हा ओबीसी समाजाचे राजकीय अस्तीत्व संपवण्याचा डाव असल्याचे सांगून ओबीसींनी एकजूटीतून तो हाणून पाडावा, असे आवाहन केले.

ओबीसींचे रद्द केलेले आरक्षण परत देण्याच्या मागणीसाठी आज राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. या अंतर्गत गंगाखेड येथील परळी नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ओबीसी संघर्ष समितीचे संयोजक, तथा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, निमंत्रक तथा शिवसेना जिल्हा ऊपप्रमुख विष्णू मुरकुटे, मनसेच्या शेतकरी आघाडीचे प्रदेश ऊपाध्यक्ष बालाजी मुंडे, जिल्हा परिषद सदस्य राजेश फड, रासपाचे सुरेशदादा बंडगर, धनगर साम्राज्य सेनेचे नारायणराव घनवटे, माधवराव शेंडगे, नगरसेवक तुकाराम तांदळे, सुवर्णकार समाजाचे तालुकाध्यक्ष विजय डहाळे, तुकाराम मैड, बालासाहेब यादव, बालासाहेब पारवे, गोविंद लटपटे, मेजर प्रल्हाद मुंडे, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष नागेश डमरे, माळी महासंघांचे परसराम गिराम, सदाशीवराव कुंडगीर, राहुल फड, ऊद्धव शिंदे, मनोज मुरकुटे, रंजीत शिंदे, गजानन आंबेकर, शाम ऊदावंत, बाळासाहेब सोनटक्के आदिंसह बहुसंख्य ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी ऊपस्थित होते.

पावती दाखवून देणगी परत घ्यावी; साक्षी महाराजांचे आवाहन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या