18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeपरभणीशेतकरी संघर्ष समितीचा रास्तारोको

शेतकरी संघर्ष समितीचा रास्तारोको

एकमत ऑनलाईन

परभणी : तालुक्यातील पेडगाव महसूल मंडळात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी २९ ऑगस्ट २०१९च्या शासन निर्णयाप्रमाणे भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी परभणी तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शनिवार, दि.०९ ऑक्टोबर रोजी पेडगाव फाटा येथे परभणी – मानवत राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पेडगाव महसूल मंडळातील सर्व गावातील शेतकरी, भजनी मंडळ सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होवून रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

पेडगाव महसूल मंडळातील आपदग्रस्त शेतक-यांना सरसगट आर्थिक मदत करावी या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावरील पेडगांव फाट्यावर संतप्त शेतक-यांनी शनिवारी जोरदार रास्तारोको आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर ठाण मांडून अतिवृष्टी झाल्यामुळे व पूर परिस्थिती उद्भवल्याने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या चार जिल्ह्यात ज्या पध्दतीने मदत वितरित करण्यात आली. त्या पध्दतीने जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी जोरदार मागणी केली.

या आंदोलनात प्रा. किरण सोनटक्के, संतोष देशमुख, राजन क्षीरसागर, माणिक कदम, माऊली कदम, टी.एम.देशमुख, नंदाताई राठोड, संगीता कडेकर, रितेश काळे, कृष्णा कटारे, प्रभू जाधव, रोहन सामाले, नारायण देशमुख, मुंजाभाऊ गायकवाड, बालासाहेब देशमुख, मंगेश देशमुख, अभिजित कदम, विशाल आर्वीकर, कांचन कदम, माऊली खरवडे, डी.के. देशमुख, मनोज राऊत, रामेश्‍वर घुले, नितीन मोरे, दिलीप साबळे, गोपाळ देशमुख, रोहिदास नवघरे, सुरेश लांडे, रमेश साबळे, रमेश गोरे, बालाजी मुंढे, अमोल देशमुख, संजय देशमुख, माऊली टाकळकर यांच्यासह संतप्त शेतक-यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी ग्रामीण पोलिस ठाण्याने चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहतुक ठप्प झाली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या