परभणी : शेतक-यांनी अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावाÞ शास्त्रज्ञाच्या संपर्कात राहून विद्यापीठाचे विविध ऍप्स तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या तंत्रज्ञान विशेष ऍपचा महिला शेतक-यांनी उपयोग करावाÞ गावामध्ये एक सहकारी तत्वावर संगणकीय सुविधा केंद्र उभारावेÞ दैनंदिन जीवनातील तानतणाव कमी करण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन व स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगिकारण्याचे आवाहन वनामकृविच्या शास्त्रज्ञांनी मांडाखळी येथील कार्यक्रमात केले.
वनामकृवि परभणी येथील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील शास्त्रज्ञ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत मांडाखळी येथे सहभागी झाले होतेÞ या कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरू डॉ.इंद्र मणि यांच्या सुचनेनूसार आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ.देवराव देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. सुरूवातीस अशोक राऊत यांच्या घरी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ.जया बंगाळे, प्रा.निता गायकवाड, डॉ.इरफाना सिद्दिकी यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट देवून डॉ.जया बंगाळे यांनी दैनंदिन जीवनात आचरणात आणावयाच्या चांगल्या सवयींचे महत्व सांगून उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितलेÞ यासाठी मुस्तफा शेख प्रभारी मुख्याध्यापक, प्रतापंिसग नाईक यांच्यासह सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य लाभले. याबरोबरच डॉ.शंकर पुरी यांनी शेती व्यवसायासाठी माहिती तंत्रज्ञाचा वापराबाबत मार्गदर्शन केलेÞ सोबतच सीताफळ पिक लागवडीबाबत चर्चा केली. यानंतर शिवार फेरी घेऊन रमेश जनार्धन राऊत यांच्या सीताफळ बागेस तर दिवाकर नामदेव राऊत यांच्या शेड नेट/हरितगृहातील (हायटेक) फुलशेती प्रकल्पास आणि स्वराज्य ऍग्रो शेतकरी बचत गट अवजार बँकेस भेट दिली.
यशस्वीतेसाठी प्रगतशील शेतकरी रमेश राऊत, अशोक राऊत, धनंजय सोनटक्के, मधुकर राऊत, शिवाजी कन्हे, शिवाजी शिळवने यांच्यासह महाविद्यालयातील प्रसाद देशमुख, राम शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये तीस शेतकरी महिला व बांधवांनी सहभाग नोंदविला.