25.9 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeपरभणीकुलसचिव पाटील यांनी परस्पर उचलले वाढीव वेतन

कुलसचिव पाटील यांनी परस्पर उचलले वाढीव वेतन

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कुलसचिव रणजित अण्णासाहेब पाटील यांनी शासनाच्या परवानगी शिवाय परस्पर वेतन वाढवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कृषी विद्यापीठाच्या नियंत्रकांनी कुलसचिव पाटील यांना नोटीस बजावली असून अतिप्रदानाची रक्कम परत करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करून पाटील यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य अजय गव्हाणे व लिंबाजीराव भोसले यांनी केली आहे.

येथील कृषी विद्यापीठात अडीच वर्षापुर्वी कुलसचिव म्हणून पाटील रूजू झाले. त्यांनी कृषी विद्यापीठांतर्गत ज्येष्ठ संशोधक, प्राध्यापक तसेच अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या बदल्या करताना नियम डावलले असल्याचा आरोप गव्हाणे व भोसले यांनी केला आहे. कुलसचिव म्हणून कार्यरत असल्यापासून पाटील यांनी ३७४००- ६७०००ग्रेड वेतन व ८७०० या वेतनश्रेणी प्रमाणे वेतन उचलले आहे. वास्तविकता २० ऑक्टोंबर २०१८ रोजीच्या कार्यालयीन आदेशात मुद्दा क्रमांक ३ अन्वये पाटील यांना मूळ सेवेत लागू असणारे वेतन, भत्ते, रजा, प्रवास वैद्यकीय सवलत, गट विमा योजना याबाबत नियम लागू असतील असे नमूद केले होते. तरी देखील कुलसचिव पाटील यांनी या विद्यापीठात कूलसचिव या पदावर रुजू झाल्यापासून ते आजतागायत वरिष्ठ वेतन श्रेणी म्हणजे ३७४००-६७०००ग्रेड वेतन, ८७०० वेतन श्रेणीनुसार वेतन उचलले असल्याचे निदर्शनास आणूण दिले आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य लिंबाजीराव भोसले यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक धवण व राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधले होते.

अखेर उशिरा का होईना, प्रसासनाने दखल घेतली. कृषी विद्यापीठाच्या नियंत्रकांनी या अनुषंगाने कुलसचिव पाटील यांना एका नोटीसीव्दारे आपणास देय असणा-या वेतनश्रेणी नुसारचे वेतन व आतापर्यंत विद्यापीठ स्तरावरून प्रदान करण्यात आलेले वेतन याच्यातील फरकाची रक्कम २१ लाख ४ हजार २५५ रुपयांची अतिप्रदान रक्कम तात्काळ शासनखाती एक रकमी भरणा करून समायोजित करावी असे निर्देश दिले आहेत. दरम्यान कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव रणजित पाटील यांनीच विद्यापीठाद्वारे परस्पर जादा वेतन उचलून शासनाची फसवणूक केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात व प्रशासकीय वतुर्ळात मोठी खळबळ उडाली आहे.

कोव्हॅक्सिनमध्ये वासराच्या रक्तद्रव्याचा वापर ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या