29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeपरभणीरूग्णाच्या मृत्युनंतर नातेवाईक संतप्त

रूग्णाच्या मृत्युनंतर नातेवाईक संतप्त

ऑक्सीजनअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; घटनेची अतिरिक्त जिल्हाधिका-यांकडून चौकशी होणार

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील सारी वाडार्तील रुग्णाचा ऑक्सीजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी शनिवारी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रचंड गोंधळ घालत वैद्यकीय अधिका‍-यांना धारेवर धरले. दरम्यान रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.

शहरातील परसावतनगरातील 65 वर्षीय व्यकीतीच प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सारी वार्डात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर होत असल्याने त्यांना ऑक्सीजन दिल्या गेले नसल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी करत तेथे चांगलाच गोंधळ घातला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी – कर्मचार्‍यांना मृत्यूचे नेमके कारण विचारण्याचा प्रयत्न केला असता तेथून कर्मचा-यांनी पळ काढल्याचा दुदैर्वी प्रकारही समोर आला. रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी – कर्मचार्‍यांनी तेथून पळ काढल्याने रुग्णाचे नातेवाईक चांगलेच भडकले होते. यावेळी नानलपेठ पोलिसांना पाचारण करण्यात आले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी पहाटे घडलेल्या प्रकाराची अतिरीक्त जिल्हाधिका‍-यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी स्पष्ट केले आहे. शासकीय रुग्णालयातील सारी वाडार्तील रुग्णाचा ऑक्सीजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घातला. नातेवाईकांचा रौद्रावतार पाहून वाडार्तील कर्मचा-यांनी तेथून पळ काढला. तसेच तेथे एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने नातवाईकांचा पारा चांगलाच चढला होता. मात्र, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रकाश डाके हे दाखल झाले.नातेवाईकांची समजूत काढली.

त्यापूर्वी नानलपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बालाजी तिप्पलवाड यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी – कर्मचारी दाखल झाले होते. शासकीय रुग्णालयातील अधिकारी – कर्मचार्‍रांची बैठक घेवून शनिवारी रात्री झालेल्या संपूर्ण घटनेची माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतली. त्यानंतर या पूर्ण घटनेची चौकशी अतिरीक्त जिल्हाधिकार्‍यांमार्फत केली जाईल. दोषींवर निश्चितच कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

लसीकरणानंतरच्या चुका टाळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या