27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeपरभणीजिंतूर तालुक्यातील २२ गणांची आरक्षण सोडत जाहीर

जिंतूर तालुक्यातील २२ गणांची आरक्षण सोडत जाहीर

एकमत ऑनलाईन

जिंतूर : जिंतुर तालुक्यातील २२ गणांची आरक्षण सोडत आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात काढण्यात आली. यावेळी लहान चिमुकलीच्या हस्ते चिठ्या काढण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी दत्ता शेवाळे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार परेश चौधरी यांच्या उपस्थितीत चिमुकली शिवानी रामप्रसाद कंठाळे हिच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले.

२२ पंचायत समिती गणाची सोडत अशी, वझर बु.-सर्वसाधारण, सावंगी भांबळे-सर्वसाधारण महिला, वाघी धानोरा-सर्वसाधारण, कु-हाडी-अनूसूचित जाती महिला, सावंगी म्हाळसा- नागरिकांचा मागास प्रवर्ग, अंबरवाडी-अनूसूचित जाती महिला, इटोली-सर्वसाधारण महिला, आडगाव बाजार-अनूसूचित जमाती, भोगाव-अनूसूचित जाती, लिंबाळा-सर्वसाधारण, पुंगळा-नागरीकांचा मागास प्रवर्ग, पांगरी-सर्वसाधारण, वरुड-सर्वसाधारण महिला, भोसी-सर्वसाधारण, चारठाणा-सर्वसाधारण महिला, जांब बु.-सर्वसाधारण, बोरी-सर्वसाधारण महिला, निवळी बु.-सर्वसाधारण महिला, वस्सा-नागरीकांचा मागास प्रवर्ग, दुधगांव-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, कोक-सर्वसाधारण व कौसडी-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या