30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeपरभणीपरभणीत रेमडिसिव्हर इंजेक्शन आता बावीशे रूपयांना मिळणार

परभणीत रेमडिसिव्हर इंजेक्शन आता बावीशे रूपयांना मिळणार

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोनावर प्रभावी औषध असलेले रेम्डेसिव्हिर इंजेक्शन यापुढे बाविसशे रुपयांमध्येच रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मरेवाड यांच्याबरोबर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिका-यांची शनिवार दि.१० रोजी सायंकाळी बैठक झाली.

या बैठकीत कोरोनावर प्रभावी औषध असलेले रेम्डेसिव्हिर हे इंजेक्शन यापुढे दोन हजार 200 रुपयांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री सचिव सूर्यकांत हाके, पवन झांझरी, अनिल हराळ, सुनील जोशी आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यात रेम्डेसिव्हिरचा काळाबाजार करत असलेल्यांवर जिल्हा प्रशासनाने नुकतीच कारवाई केली. या पार्श्वभूमीवर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिका‍-यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याशी चर्चा करत बैठकीतून निर्णय घेण्यात आला. दरम्यान, यापुढे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना रेम्डिसिव्हिर हे औषध बावीसशे रुपयांनाच मिळेल, अशी माहिती असे अध्यक्ष संजय मंत्री व सचिव सूर्यकांत हाके यांनी यावेळी दिली.

थोडी तरी लाज बाळगा!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या