21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeपरभणीपरभणी शहरात दिवसभर पावसाची रीपरीप

परभणी शहरात दिवसभर पावसाची रीपरीप

एकमत ऑनलाईन

परभणी : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार परभणी शहरात बुधवारी सकाळ पासून रिमझीम पावसास सुरूवात झाली. हा पाऊस दिवसभर सुरू राहिल्याने सखल भागात नेहमीप्रमाणे पाणी साचल्याचे पहावयास मिळाले. दिवसभर पाऊस सुरू राहिल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करण्याची वेळ आली.

परभणी शहरासह जिल्हाभरात २१ जुलै रोजी सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. परभणी शहरात दुपारी ११ वाजता पासून रिमझीम पावसास सुरूवात झाली. हा पाऊस सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू च होता. त्यामुळे कामानिमित्त बाहेर निघालेल्या किंवा बाहेर गावाहून परत घरी येणा-या नागरीकांना अडचणींचा सामना करण्याची वेळ आली. परभणी शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने अनेकांच्या घरात पाणी साचले होते. आज सुरू झालेला पाऊसही दिवसभर सुरू असल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

दरम्यान जिंतूरमध्येही जोरदार पाऊस झाला असून शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाल्याने नागरीकांना त्रासास सामोरे जावे लागले. मानवत शहर व परीसरातही दिवसभर ढगाळ वातवरणासह रिमझीम पाऊस सुरू होता. त्यामुळे दैनंदिन कामाजावर परीणाम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

ड्रगनची नजर उत्तराखंडच्या सीमेवर?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या