मानवत : मानवत शहरातील अमरेश्वर मंदिर परिसरात असलेल्या पुरातन बारवाचे संवर्धन आभियान अंतर्गत शहरातील अनेक तरुणांनी या बारव संवर्धन अभियानास श्रमदानाच्या माध्यमातून या पुरातन बारवाचे संवर्धन व पुनर्जीवन करण्याचे काम हाती घेतले आहेÞ या अभियानास आज १७ दिवस झाले आहेत¯. या अभियानाचे महत्व ओळखून नागरीकांसह लोकप्रतिनिधींचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
या अभियानाचा उद्देश हा नैसर्गिक संपत्तीचा वारेमाप वापर करणे हा होय. या बारव संवर्धन अभियानाची सुरुवात ही अक्षयतृतीयाचा शुभ मुहूर्तावर करण्यात आली असून या आभियानात आतापर्यंत ५० पेक्षा जास्त तरुण जोडले गेले आहेत व हे तरुण दरोज सकाळी दोन तास या अभियानास श्रमदान देत आहेत. आता पर्यंत बारव स्वछतेचे काम ५० फुटापर्यंत गेले असून या संवर्धन आभियानाची दखल प्रशासनाकडून आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तीकडूनही घेतली जात आहे.
यात आमदार मेघना बोर्डीकर, मानवत नगरीचे युवा नेते डॉ.अंकुशराव लाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्यासह यावेळी संजय कु-हाडे, अभिजित करपे, पंकज कुमावत, दत्ता कच्छवे, श्याम बैरागी, महादु औरंगे, एन.डी. सोळंखे, डॉ. अमोल पातेकर, संजय कुसुंदल, राम दहे, शुभम कडतन, आ. बालाजी बंडे (आबा) धनजयसिंह दहे यांच्यासह समस्त मानवतकर पर्यावरणप्रेमी नागरिक व महिलाही या बारव संवर्धन अभियानास मोलाचे सहकार्य करीत आहेत.