19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeपरभणीमानवतमध्ये दहा दिवसांसाठी निर्बंध

मानवतमध्ये दहा दिवसांसाठी निर्बंध

एकमत ऑनलाईन

मानवत : मानवत शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत कोरोना रूग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभुमीवर धार्मिकस्थळे, शाळा, आठवडी बाजारासह गर्दीची ठिकाणे १६ ऑक्टोबर पर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी घेतला आहे. नागरिकांनी दहा दिवस संयम ठेवून नियमांचे पालन करावे असे आवाहन गोयल यांनी केले आहे.

मानवत शहरात मागील आठवडयात कोरोना बाधीत रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरीकांनी कोणतीही लक्षने दिसताच आरटीपीसीआर चाचणी करून घेणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने काही बाबतीत निर्बंध घालणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरातील आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, शाळा, लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे, खेळाची मैदाने, गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात अलाा आहे. या ठिकाणावरून कोरोना प्रसार होऊ नये आणि विनामास्क फिरणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले आहेत. दरम्यान जिल्हाधिकारी गोयल यांनी आज मानवत शहरास भेट देवून पाहणी केली. तसेच तहसील कार्यालयात बैठक घेवून येत्या दहा दिवसांत करावयाच्या उपाययोजना संदर्भात निर्देश दिले.

चाचणीसाठी नमुना न घेताच अहवाल पॉझिटीव्ह
शहरातील शुभम कुमावत या युवकाने सांगितले की, तो लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयात गेला होता. यावेळी येथील कर्मचा-याने चाचणीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी नावं व मोबाईल देण्याची विनंती केली. त्याने नाव व मोबाईल क्रमांक दिल्यानंतर दुसरे दिवशी रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-याने दूरध्वनीवरून चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगून रुग्णालयात दाखल व्हावे असे सांगितले. या प्रकरणी कुमावत याने घडलेल्या प्रकाराची तहसिलदार यांच्याकडे लेखी तक्रार दिली. यांसदर्भात जिल्हाधिकारी यांना विचारले असता त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या