24.4 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeपरभणीपरतीच्या पावसाचा पुन्हा फटका: शेतात साचले पाणी

परतीच्या पावसाचा पुन्हा फटका: शेतात साचले पाणी

एकमत ऑनलाईन

पाथरी : गेली चार पाच दिवस विश्रांती दिलेला परतीच्या पावसाने हवामान विभागाच्या अंदाजा नुसार गुरुवारी पुन्हा जोरदार तडाखा देत उर्वरीत पिकांचे मोठे नुकसान केले. पाथरी तालुक्याच्या चार महसुल मंडळात सुरुवाती पासुनच लहरी पणे पाऊस पडला मंडळ असलेल्या गावी काही ठिकाणी कमी तर चार पाच किमी च्या अंतरात जोरदार बरसत असल्याने नोंदी या मुख्यालयी पडलेल्या पावसाच्या प्रमाणाच्या होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या वेळी संकट टळले असे वाटत असतांनाच गुरुवार २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली बाभळगाव मंडळात लिंबा विटा अशा अनेक गावात ढग फुटी सारखा पाऊस झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

या पावसा मुळे राहिले साहीले पिक ही पाण्यात बुडाले. शेतशिवारातील कापसाच्या पिकात गुडघाभर पाणी साचले आहे. या मुळे आता कापसाचे राहिलेले पिक हातचे गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. पाथरी शहर परिसर,रेणापुर वाघाळा पोहेटाकळी,पिंपळगाव अशा सर्वदुर ठिकाणी जोरदार पाऊस पडला. या पावसा मुळे रब्बीची पेरणी ही वाया गेल्याचे शेतकरी सांगत आहे. बाभळगाव मंडळातील विटा, लिंबा अशा गावांतील कापसाच्या शेतात गुडघाभर पाणी साचलेले दिसुन येत आहे. निसगार्ने भरभरुन दिलं असे वाटत असतांनाच. तोच हिराऊन नेत असल्याचे डबडबलेल्या डोळ्यांनी शेतक-यांना पहावं लागत असल्या शिवाय पर्याय नाही. आता शासनाने त्वरीत मदत करावी अन्यथा रब्बी पेरणी करणे ही शेतक-यांना मुश्कील असल्याचे शेतकरी सांगत आहेत.या विषयी गुरुवारीच पाथरी तालुका शिवसेनेने सरसगट संपुर्ण तालुक्यातील शेतपिकांचे पंचनामे करून त्वरीत पिकविमा मिळऊन देत शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

श्री केशवराज विद्यालयात ‘माझी आई जगातील पहिले विद्यापीठ’ हा कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या