27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home परभणी महसुल आयुक्त फड यांनी केली कोरोना विभागाची पाहणी

महसुल आयुक्त फड यांनी केली कोरोना विभागाची पाहणी

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा औरंगाबाद महसूल अप्पर आयुक्त विजयकुमार फड यांनी कोरोना विभागास भेट देऊन घेतला आसता वैद्यकीय अधिक्षक डॉ.हेमंत मुंडे सह आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी व कमर्चारी यांनी कोरोना प्रादुर्भाव वाढु नये यासाठी केलेल्या कामा बाबत समाधान व्यक्त करून शहरासह तालुक्यात रूग्णाची संख्या शुन्यावर नेण्याचा सुचना देण्यात आल्या.

शहरातील लग्न स्वागत सभारंभातुन झालेला कोरोनाचा प्रसाराने रूग्ण संख्येत लक्षणीय वाढ होताना आढळून येत होती.पण वैद्यकीय अधिक्षक डॉ.हेमंत मुंडे,डॉ.केशव मुंडे,डॉ.योगेश मल्लुरवार सह आरोग्य कमर्चारी यांनी युद्ध पातळीवर आरोग्य सेवा देत कोरोना साखळी तोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नास यश मिळत गेले.याच संदर्भातचा आढावा घेण्यासाठी औरंगाबाद महसुल अप्पर आयुक्त विजयकुमार फड यांनी कोरोना विभागास भेट देऊन कोरोना विभागास भेट देत या बाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तसेच त्यांना देण्यात येणारे उपचार,संस्थात्मक विलगी करणाची माहिती घेण्यात येणा-या एंटीजन टेस्ट व विविध उपाय योजना सह सार्वजनिक विहिरी, घन वृक्ष लागवड, पिक विमा, पीक परिस्थिती, याबाबतही सविस्तर आढावा घेतला.

गंगाखेड शहर व तालुक्यातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती प्रशासनान,आरोग्य विभाग यांनी चांगल्या प्रकारे हाताळल्याबद्दल त्यांनी सर्व महसूल,आरोग्य, पोलीस, ग्रामविकास यंत्रणांचे कौतुक केले व पुढील उपाययोजनां बाबत मार्गदर्शन केले.या आढावा बैठकीत गंगाखेड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,तहसिलदार स्वरूप कंकाळ, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर,वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बिराजदार, तालुका कृषी अधिकारी मस्के इत्यादी उपस्थित होते.

पवारांचे कोणतेही विधान निरर्थक नसते : राऊत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या