25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीजिंतूर तालुक्यात रिमझिम पाऊस; दिवसभर सूर्य दिसलाच नाही

जिंतूर तालुक्यात रिमझिम पाऊस; दिवसभर सूर्य दिसलाच नाही

एकमत ऑनलाईन

जिंतूर : शहरासह तालुक्यात गुरुवारी २३ गुरुवारी सलग सात झडीचा रिमझिम पाऊस झाला.त्यानंतरही पावसाळी वातावरण कायम राहिल्याने सायंकाळपर्यंत तालुक्याला सूर्यदर्शन झाले नाही.

गुरुवारी पहाटे पासूनच तालुक्यात सर्वत्र रिमझिम पावसाला सुरुवात झाली ती दुपारी एक वाजेपर्यंत सुरुच होती.त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली असलीतरी आकाश आभ्राच्छादित राहिले त्यामुळे संध्याकाळ पर्यंत पावसाळी वातावरण कायम होते. सात तासांच्या संततधार पावसामुळे शेतातील अंतर मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला असून सखल शेतजमीनीत पाणी साचल्याने या जमिनीतील पिकांना धोका पोचण्याची शक्यता नाकारता येत आहे.शहरातील रस्ते निसरडे बनले असल्याने रहदारीला, वाहतूकीला व्यत्यय येत आहे.

दरम्यान, मागील सहा दिवसांपासून तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात हलका व मध्यम स्वरुपाचा समाधानकारक पाऊस झाला त्यामुळे पिक परिस्थितीदेखील सुधारली. अंतर मशागतीची कामेही जोरात सुरू झाली.दरम्यान बुधवारी (दि.२२) पावसाने विश्रांती घेतली तोच दुसरे दिवशी पुन्हा हजेरी लावली असून अद्याप (दि.२२ जुलै)पर्यंत वार्षिक सरासरीच्या ३४ टक्के समाधानकारक पर्जन्यमान झाले आहे.

Read More  व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही : उदयनराजे भोसले

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या