पूर्णा : जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा मधील कुस्ती स्पर्धांमधे श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय पूर्णा येथील विद्यार्थी ऋषिकेश मोहिते (१२ वी कला) याने ७९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला आहेÞ त्यामुळे तो औरंगाबाद येथील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झालेला आहे.
श्री गुरु बुद्धी स्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव प्रा. गोविंद कदम, कोषाध्यक्ष उत्तमराव कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.राजकुमार, उपप्राचार्य डॉ. संजय दळवी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक अनुशाल्व शेजुळ, पर्यवेक्षक उमाशंकर मिटकरी, कार्यालयीन अधीक्षक अरुण डुब्बेवार, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ऋषिकेशचे अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक सतीश बरकुंटे यांचे ऋषिकेश मोहिते यास मोलाचे मार्गदर्शन लाभले.