28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeपरभणीग्रामीण भागातील रस्त्यांची कामे जलद गतीने करणार - आमदार डॉ. राहुल पाटील

ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे जलद गतीने करणार – आमदार डॉ. राहुल पाटील

एकमत ऑनलाईन

परभणी : मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जास्तीत जास्त शासकीय योजना ग्रामीण भागात आणण्याचा आपला प्रयत्न असून भविष्यात एकही रस्ता कच्चा राहणार नाही यासाठी रस्त्यांची कामे जलद गतीने केली जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल पाटील यांनी केले.

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त तालुक्यातील जलालपूर येथे हभप काशिनाथ महाराज माने फुलकळसकर यांचे कीर्तन व विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी आमदार डॉ. पाटील म्हणाले की, मतदारसंघात विविध विकास कामे चालू असून कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही.

मतदारसंघात विकास कामांसोबतच मोतीबिंदूमुक्त विधानसभा, आमदार आपल्या दारी उपक्रम, मातोश्री मीनाताई ठाकरे विधवा, परित्यक्ता स्वावलंबन संकल्प योजना, महारोजगार मेळावा असे विविध उपक्रम मतदारसंघात राबवून मतदारसंघातील सर्वच क्षेत्रातील जनतेची कामे करण्यात येत आहेत.

यावेळी आ. डॉ. राहुल पाटील व मान्यवरांच्या हस्ते जलालपूर येथे ९९ लाख रुपये मंजूर निधीतून होणा-या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच ४८ लाख रुपयांच्या मातोश्री पांदण रस्ता, १० लाख रुपयांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह, १० लाख रुपयांतून अंतर्गत सिमेंट रस्ता, ०३ लाख रुपयांचे सार्वजनिक शौचालय बांधकाम या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपजिल्हाप्रमुख सदाशिवराव देशमुख, गजानन देशमुख, दिनेश बोबडे, संदीप झाडे, प्रभाकर जैस्वाल आदींची उपस्थिती होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या