21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeपरभणीसंततधार पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते बंद

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते बंद

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यात काल पासून होत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला असून रस्ते बंद झाले आहेत. पिंगळगढ नाल्याच्या पुरामुळे सायाळा, ताडकळस मार्ग बंद झाला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तसेच मानवत तालुक्यातील मगर सावंगी गावाचाही दुधना नदीच्या पुरामुळे संपर्क तुटला असून नागरीक भयभीत झाले आहेत.

जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नागरीकांचे नुकसान झाले होते. तोच परभणी शहरासह सर्वच तालुक्यात बुधवार पासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. परभणी तालुक्यातील पिंगळगढ नाल्याला यामुळे पूर आला असून परभणी ते ताडकळस मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. तसेच मानवत तालुक्यात दुधना नदीला पूर आल्यामुळे या ठिकाणच्या रस्त्यावरून पाणी वाहत होते.

त्यामुळे मगर सावंगी गावाचा संपर्क तुटला होता. एका बाजुला नदी असून दुस-या बाजुला रस्त्यावर पाणी पातळी वाढल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. याशिवाय जिंतूर मार्गावरील करपरा नदीला पूर आल्यामुळे बोरी येथेही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सहा महिन्यानंतर पुन्हा शेतकरी सज्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या